ग्राहकाकडून जमा केलेल्या सव्वालाखाच्या रकमेचा अपहार
नोकराने केली मालकाची फसवणूक
PG
Prashik Ghaste
1 મિનિટ વાંચન

नोकराने केली मालकाची फसवणूक
पिंपरी: नोकराने मालकाची फसवणूक करून ग्राहकांकडून गोळा केलेली १ लाख १५ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. हा प्रकार काळेवाडी येथे २५ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते साडेअकराच्या दरम्यान घडला.

विकास विनोद रमनानी (वय ३०, रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युनूस खान (वय ३०, रा. नढेनगर, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने युनूस याला विश्वासाने वसुलीसाठी पाठवले होते.
आरोपीने ताथवडे येथील 'ए टू झेड फुटवेअर्स'कडून ४५ हजार आणि धायरी येथील शाखेतून ७० हजार अशी १ लाख १५ हजार रुपयांची रोकड फिर्यादीला न देता लबाडीच्या हेतूने स्वत:कडे ठेवून पळ काढला.
