મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : मिर्झापूर द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; चार दिवसांत १०० कोटी पार

Mumbai News : मुंबई : अली फजल आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मिर्झापूर द मूव्ही’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

मिर्झापूर द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; चार दिवसांत १०० कोटी पार गुड्डू, मुन्ना आणि कालीन भैय्याची क्रेझ कायम; सोमवारची कमाईही दमदार
मिर्झापूर द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; चार दिवसांत १०० कोटी पार गुड्डू, मुन्ना आणि कालीन भैय्याची क्रेझ कायम; सोमवारची कमाईही दमदार

Mumbai News : गुड्डू, मुन्ना आणि कालीन भैय्याची क्रेझ कायम

Mumbai News : मुंबई : अली फजल आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मिर्झापूर द मूव्ही’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. गुड्डू भैया, मुन्ना भैया आणि कालीन भैया ही लोकप्रिय पात्रे मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.https://maharashtramirror.com/ Mumbai news
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही उत्सुकता बॉक्स ऑफिसवरील कमाईतही दिसून येत आहे. ‘मिर्झापूर द मूव्ही’ने अवघ्या चार दिवसांत १०० कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, सोमवारच्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई कायम ठेवली.https://maharashtramirror.com/ mumbai News
अपेक्षेपेक्षा मोठी ओपनिंग
ट्रेड अॅनालिस्ट आणि समीक्षकांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अंदाज १८ ते २० कोटी रुपयांच्या आसपास व्यक्त केला होता. मात्र, चित्रपटाने अपेक्षेपेक्षा मोठी सुरुवात करत पहिल्याच दिवशी २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली.https://maharashtramirror.com/ Mumbai news
यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. दुसऱ्या दिवशी ‘मिर्झापूर द मूव्ही’ने ३२ कोटी रुपये, तर रविवारी तब्बल ३६ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठत बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवून दिली आहे.

શેર કરો