મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

MHADA Kamathipura Cluster Redevelopment : कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकासाला गती; म्हाडाचा विकासकांशी करार

दिवाळीपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन; ८ हजारांहून अधिक रहिवासी-व्यावसायिकांचे पुनर्वसन

મ
મુબારક

2 મિનિટ વાંચન

MHADA Kamathipura Cluster Redevelopment :

मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या | MHADA Kamathipura Cluster Redevelopment

  • दिवाळीपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन; ८ हजारांहून अधिक रहिवासी-व्यावसायिकांचे पुनर्वसन
  • मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : MHADA Kamathipura Cluster Redevelopment : दक्षिण-मध्य मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा परिसराच्या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत प्रकल्प राबविण्यासाठी भगिरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माठी डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्यासोबत बांधकाम व विकास संस्था (C&DA) करार गुरुवारी (दि. १७) करण्यात आला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे म्हाडाने सांगितले.

    MHADA Kamathipura Cluster Redevelopment

    वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. Maharashtra Mirror

    कामाठीपुरातील गल्ली क्रमांक १ ते १५ पर्यंत सुमारे ३४ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या क्षेत्रात सुमारे ४७५ उपकरप्राप्त आणि २५९ बिगर उपकरप्राप्त इमारती आहेत. उपलब्ध प्रकल्प आराखड्यानुसार सुमारे ८,००१ निवासी व व्यावसायिक भाडेकरू-रहिवासी या प्रकल्पाशी संबंधित असून, त्यामध्ये ६,६२५ निवासी आणि १,३७६ अनिवासी भाडेकरूंचा समावेश आहे. परिसरात सुमारे ८०० जमीनमालक असल्याचे म्हाडाने नमूद केले आहे.

    MHADA Kamathipura Cluster Redevelopment

    पात्र रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर

    डीसीपीआर-२०३४ मधील विनियम ३३(९) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून म्हाडाची नोडल एजन्सी आणि विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पातील पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौरस फुटांचे पुनर्वसन सदनिका देण्याचे प्रस्तावित आहे. व्यावसायिक गाळेधारकांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. प्रकल्पातून म्हाडाला सुमारे ४४ हजार चौरस मीटर गृहनिर्माण साठा उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यातून सुमारे ९०० अतिरिक्त घरे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. MHADA Kamathipura Cluster Redevelopment :

    पुनर्वसन इमारतींसह निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक सुविधा, मनोरंजनासाठी मोकळ्या जागा, हरित क्षेत्र आणि आधुनिक नागरी पायाभूत सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. भूकंपरोधक बांधकाम, पावसाच्या पाण्याचे संकलन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि लिफ्टसह आवश्यक सामाजिक व नागरी सुविधांचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

    रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे

    पुनर्विकासाच्या काळात रहिवाशांना आर्थिक दिलासा देण्यासाठी दोन वर्षांचे भाडे आगाऊ, त्यानंतरच्या एका वर्षाचे धनादेश तसेच स्थलांतर आणि इतर खर्चासाठी एकरकमी २५ हजार रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    व्यावसायिक गाळेधारकांसाठी जागेच्या क्षेत्रफळानुसार भाडे निश्चित करण्यात आले आहे. २०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी दरमहा २५ हजार रुपये, २०० ते ४०० चौरस फुटांसाठी ३० हजार रुपये आणि ४०० चौरस फुटांपेक्षा अधिक जागेसाठी ३५ हजार रुपये भाडे मंजूर करण्यात आले आहे. जमीनमालकांना पुनर्विकासाच्या कालावधीत प्रति भूखंड दरमहा २५ हजार रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

    म्हाडाने जून २०२५ मध्ये C&DA नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. राज्य सरकारने ६ एप्रिल २०२६ रोजी संबंधित विकासकांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आणि ८ एप्रिलला अटी-शर्तींसह देकारपत्र जारी करण्यात आले. रहिवासी व जमीनमालकांची पात्रता, प्रकल्प क्षेत्र निश्चित करणे आणि संमतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रकल्प व्यवहार्यता समितीही स्थापन करण्यात आली आहे.

    “कामाठीपुराची ऐतिहासिक ओळख जपत आधुनिक, शाश्वत आणि नागरिककेंद्री परिसर उभारण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून प्रकल्प पुढे नेण्यात येईल,” असे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

    શેર કરો