Marathi Rajyabhasha Din : अमृतातेही पैजा जिंके! आज 'मराठी राजभाषा दिन'; अवघा महाराष्ट्र मायबोलीच्या गजराने दुमदुमला!
Marathi Bhasha Din : कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी अस्मितेचा जागर | सातासमुद्रापार घुमतोय मराठीचा डंका | आपल्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
2 મિનિટ વાંચન

Marathi Bhasha Din : कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी अस्मितेचा जागर | सातासमुद्रापार घुमतोय मराठीचा डंका | आपल्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
Mumbai | "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…" कविवर्य सुरेश भटांच्या या ओळी आज महाराष्ट्राच्या कणाकणात घुमत आहेत. आज 27 फेब्रुवारी, म्हणजेच 'मराठी राजभाषा दिन'. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात मराठी राजभाषा दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
यंदाचा हा दिवस अधिक खास आहे, कारण मराठीला नुकताच लाभलेला 'अभिजात भाषेचा दर्जा' आणि जागतिक स्तरावर वाढलेला तिचा विस्तार. शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये आज ग्रंथदिंडी, वाचन प्रेरणा उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही सकाळपासूनच मराठीचा गौरव करणारे मेसेजेस आणि स्टेटसचा पूर आला आहे.
मराठी राजभाषा दिनाचे खास शुभेच्छा संदेश
