મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Jalna News : जरांगेची प्रकृती खालावली – उपचार घेण्यास नकार

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील अकराव्या बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

जरांगेची प्रकृती खालावली – उपचार घेण्यास नकार बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस
जरांगेची प्रकृती खालावली – उपचार घेण्यास नकार बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस

Jalna News : बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस


Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील अकराव्या बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा केली. जरांगे पाटलांनी उपचारासाठी नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यापोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीकडे सरकारचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेनंतरही आंदोलन सुरूच असल्याने सरकारकडून पुढील चर्चेसाठी हालचाली सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या भेटीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.https://maharashtramirror.com/ Jalna News

आंतरवालीत जनसागर आणि राजकीय पाठिंबा
उपोषणाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचे लोंढे सतत दाखल होत आहेत. जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. https://maharashtramirror.com/ jalna News

५ ते ६ सप्टेंबरपासून मुंबईकडे निघा- जरांगे
मराठा बांधवांनी आंतरवालीत गर्दी न करता ५-६ सप्टेंबरपासून मुंबईकडे निघावे. मात्र, आझाद मैदानाकडे न जाता मित्र-नातेवाइकांकडे थांबावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी केले.https://maharashtramirror.com/ Jalna news

जरांगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून गैरसमज करून घेऊ नये-सामंत
मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत, भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर सामंत म्हणाले की, जरांगेंच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा झाली आहे. जरांगेंशी चोवीस तासांत चर्चा करून मार्ग काढला जाईल. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून गैरसमज करून घेऊ नयेत. ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणे. मराठा समाजाने आंदोलनासाठी मुंबईत येऊ नये, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशीही मुंबईत आंदोलन करू नये यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. लाड म्हणाले, काही अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याच्या जरांगेंच्या तक्रारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.

શેર કરો