Mumbai News : आंदोलनासाठी मनोज जरांगेना पाठिंबा देणार
Mumbai News : मुंबई - “जेव्हा सरकार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देण्यात अपयशी ठरते, तेव्हाच एखाद्याला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतो.
1 મિનિટ વાંચન

Mumbai News : कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख दिपके यांची प्रतिक्रिया
Mumbai News : मुंबई - “जेव्हा सरकार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देण्यात अपयशी ठरते, तेव्हाच एखाद्याला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतो. जरांगे पाटील मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षण आणि रोजगाराचा मूलभूत हक्क मागत आहेत, यात काहीही चुकीचे नाही. मनोज जरांगे स्वतः दिल्लीत आंदोलनाला आले होते, त्यामुळे मी नक्कीच त्यांची भेट घेऊन पाठिंबा देणार आहे.” कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनासंदर्भात दिपके बोलत होते.https://maharashtramirror.com/ Mumbai News
जेव्हा एखादा व्यक्ती आंदोलन करतो तेव्हा त्याच्या समोरचा तो शेवटचा पर्याय असतो. तिथं सरकार त्यांना भाग पाडतं. जर सरकारने समाजाच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं असतं आणि रोजगाराचे संधी दिली असती तर मनोज जरांगे यांना आंदोलन करावा लागला असता का?” असा सवाल दिपकेंनी केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
“मनोज जरांगे पाटील काही चुकीचं मागत नाहीत, मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार मागत आहेत, रोजगाराचा अधिकार मागत आहेत. याची गरज यासाठी पडली आहे की सरकार त्या दोन गोष्टीवर पूर्णपणे अपेक्षित ठरले आहे. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण, रोजगाराची संधी मिळत नाही. हे सरकारचं अपयश आहे की त्यांना आंदोलन करावं लागत आहे.” https://maharashtramirror.com/ Mumbai News
“आम्हाला जंतर-मंतरवर जसं पस्तीस दिवस सरकारने बसून ठेवलं होतं. मनोज जरांगेसोबत तुम्ही असं करु नका, त्यांच्याशी तात्काळ चर्चा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा,” असे दिपके यांनी म्हंटले आहे.
