મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Jalana News : विखे पाटलांनी गोड बोलून मराठा समाजाचे एक वर्ष वाया घालवले : मनोज जरांगे

Jalna News : वडीगोद्री (जि.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

विखे पाटलांनी गोड बोलून मराठा समाजाचे एक वर्ष वाया घालवले : मनोज जरांगे
विखे पाटलांनी गोड बोलून मराठा समाजाचे एक वर्ष वाया घालवले : मनोज जरांगे

Jalna News : वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी मंगळवारी मंत्री तथा मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘विखे पाटील पळपुटे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून मराठा समाजाचे वाटोळे केले. गोड बोलून त्यांनी आमचे एक वर्ष वाया घालवले,’’ असा आरोप जरांगे यांनी केला.https://maharashtramirror.com/ Jalana News

हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले, असा दावा जरांगे यांनी केला. ‘‘उद्धव ठाकरेंनी टिकवले नाही आणि फडणवीस यांनी खूप दिले, एवढेच तुणतुणे विखे पाटील वाजवतात,’’ अशी टीकाही त्यांनी केली.https://maharashtramirror.com/ Jalana News

समन्वयक फोडल्याचा आरोप

विखे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये फूट पाडल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. ‘‘अशा समन्वयकांना ते माझ्या अंगावर सोडत आहेत. माझ्याविरोधात कट रचणाऱ्या व्यक्तींपैकी एका आरोपीची विखे पाटील यांनी भेट घेतली होती. या सर्व बाबींचे पुरावे माझ्याकडे आहेत,’’ असे जरांगे म्हणाले. आंदोलन आणि बैठका घेणाऱ्यांवर आपण कोणतीही टीका करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ jalana News

प्रकृती खालावली; सात सलाईन

दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाचा मंगळवारी अकरावा दिवस होता. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी दूरध्वनीवरून जरांगे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सलाईन लावण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळपर्यंत सात सलाईन लावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राठोड यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर आणि खासदार नागेश आष्टीकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.https://maharashtramirror.com/ jalana News

શેર કરો