तरुणी समोर अश्लील कृत्य करणाऱ्याला ४८ तासांच्या आत बेड्या
ओळख लपवण्यासाठी संशयिताने कपडे बदलले पण शूज आणि टी शर्टच्या रंगावरून सापडला
1 મિનિટ વાંચન

ओळख लपवण्यासाठी संशयिताने कपडे बदलले पण शूज आणि टी शर्टच्या रंगावरून सापडला
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील सेंट मदर तेरेसा उड्डाण पुलावर तरुणी समोर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील एका मॉल मध्ये तो बाऊंसर म्हणून नोकरी करीत होता.

तरुणी समोर अश्लील कृत्य करून स्वतःची ओळख लपवण्यासाठी माथेफिरू तरुणाने आपले कपडे बदलले होते. मात्र या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसताना आरोपी पोलिसांनी जवळपास ६०-७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीच्या शूज आणि टी-शर्टच्या रंगावरून वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे नगर इथून बेड्या ठोकल्या आहेत. झाकीर शेख (वय ४३ वर्ष) असे आरोपीचे नांव आहे. आरोपी हा एका मॉलमध्ये बाऊन्सर चे काम करत असून त्याने हे लज्जास्पद कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.
