મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime News : चायनीज गाडा लावण्याच्या वादातून एकाला मारहाण

पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

મ
મુબારક

1 મિનિટ વાંચન

Pune Crime News : चायनीज गाडा लावण्याच्या वादातून एकाला मारहाण

पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : चायनीज गाडा लावण्याच्या वादातून एका व्यावसायिकाला, त्याच्या भावाला आणि मित्राला लाकडी दांडके, बीअरच्या बाटल्या आणि दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंदवण्यात अाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुरुषोत्तम दासाणी, राहुल खेमचंद दासाणी (दोघे रा. निगडी प्राधीकरण), सौरभ संतोष सिंग (रा. पिंपरी कॉलनी, पिंपरी), सुमित रमेश थोरात (रा, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर, राहुल, सौरभ आणि सुमित यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत लक्ष्मण बुडा (रा. गंगानगर आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपला चायनीज गाडा बंद करून आवरत असताना आरोपी पुरुषोत्तम याने दुकानासमोरील गाडा हटवण्यास सांगून शिवीगाळ व हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी सौरभ आणि सुमित यांनी बीअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात फोडली, तर राहुल याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीचा भाऊ दीपक आणि मित्र महाजीत यांनाही आरोपींनी मारहाण केली. या घटनेचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Man assaulted following a dispute over setting up a Chinese food cart.

Man assaulted following a dispute over setting up a Chinese food cart.

શેર કરો