Mumbai News : मालवणीत दंगल नियंत्रणाची ‘मॉक ड्रिल’ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी; १०० ते १५० जणांच्या जमावाचे प्रात्यक्षिक
Mumbai News मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच दंगलसदृश परिस्थिती उद्भवल्यास ती प्रभावीपणे हाताळण्यासाठी मालवणी पोलिसांनी ‘दंगल काबू मॉक ड्रिल’ राबवली.
1 મિનિટ વાંચન

Mumbai News मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच दंगलसदृश परिस्थिती उद्भवल्यास ती प्रभावीपणे हाताळण्यासाठी मालवणी पोलिसांनी ‘दंगल काबू मॉक ड्रिल’ राबवली. मालाड पश्चिम येथील म्हाडा, मालवणी गेट क्रमांक ८ परिसरातील वंदे मातरम मैदानावर गुरुवारी (दि. ३) सायंकाळी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
पोलीस उपायुक्त, उत्तर परिमंडळ-२ संदीप घुगे यांच्या आदेशाने या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. सरावादरम्यान मालवणी बिट मार्शल-५ यांनी नियंत्रण कक्षाला वंदे मातरम मैदानावर दोन गटांत जोरदार मारामारी सुरू असून, सुमारे १०० ते १५० जणांचा जमाव जमल्याचा आणि तातडीने पोलीस मदतीची आवश्यकता असल्याचा काल्पनिक संदेश दिला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
हा संदेश मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ११ अधिकारी, २५ पोलीस अंमलदार, आरसीपी प्लाटून, मालवणी पोलीस ठाण्याची मोबाईल वाहने आणि बिट मार्शल घटनास्थळी रवाना झाले. दोन गटांत मारामारी सुरू असल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमाराचे प्रात्यक्षिक करून जमाव पांगविला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
या सरावाचा भाग म्हणून चार जण किरकोळ जखमी झाल्याची परिस्थिती निर्माण करून त्यांना मोबाईल वाहनाच्या मदतीने शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच तीन ते चार संशयितांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्याची कार्यवाहीही सरावादरम्यान करण्यात आली. त्यानंतर जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचे दाखविण्यात आले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
मॉक ड्रिलनंतर मिल स्पेशल आणि एटीसी पथकाच्या मदतीने मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी आणि परिसरातील प्रमुख व्यक्तींची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने या वेळी चर्चा करण्यात आली.
पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांच्या आदेशाने व उपस्थितीत, सहाय्यक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी, पोलीस निरीक्षक जगदेव, पोलीस निरीक्षक सुरसे यांच्यासह अधिकारी, पोलीस अंमलदार, आरसीपी प्लाटून, मोबाईल वाहने आणि बिट मार्शल यांनी ही मॉक ड्रिल पार पाडली. सायंकाळी ४.१० वाजता सुरू झालेला सराव ५.३५ वाजता संपला.
