Pune News : एस.टी.स्थानकांवर तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे
Pune News :पुणे,- राज्यातील एस.टी.
વક
વિક્રાંત કુલકર્ણી
1 મિનિટ વાંચન

Pune News :पुणे,- राज्यातील एस.टी. स्थानकांवर तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा प्रादेशिक विभागातील बसस्थानकांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
बसस्थानकांवर तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने त्यांना सामाजिक आणि शारिरीक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः प्रवासादरम्यान त्यांची कुचंबणा होते.ही बाब लक्षात घेवून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळाला स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या.
