મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : ऑक्टोबरमध्ये विजेच्या मागणीचा उच्चांक;उष्णतेमुळे वाढली मागणी, ३८ हजार मेगावॅटची नोंद

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : ऑक्टोबर महिन्यातही उष्णतेचा तडाखा कायम असल्याने राज्यातील विजेची मागणी वाढली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

ऑक्टोबरमध्ये विजेच्या मागणीचा उच्चांक;उष्णतेमुळे वाढली मागणी, ३८ हजार मेगावॅटची नोंद
ऑक्टोबरमध्ये विजेच्या मागणीचा उच्चांक;उष्णतेमुळे वाढली मागणी, ३८ हजार मेगावॅटची नोंद

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : ऑक्टोबर महिन्यातही उष्णतेचा तडाखा कायम असल्याने राज्यातील विजेची मागणी वाढली आहे. १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात तब्बल ३८ हजार २१ मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली. राज्यातील आतापर्यंतची ही सर्वाधिक मागणी ठरली. मात्र, सौरऊर्जा प्रकल्प आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे वाढती मागणी पूर्ण करताना महावितरणला मोठा दिलासा मिळाला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

या दिवशी उच्चदाब वीज प्रणालीतून ३२ हजार ९२१ मेगावॅट, तर सौरऊर्जा प्रकल्प आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून सुमारे ५ हजार १०० मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे विक्रमी मागणीच्या काळातही विजेची गरज पूर्ण करणे शक्य झाले.

सौर कृषी वाहिनी योजनेचा मोठा आधार

राज्यातील ४८ लाख कृषी पंपांना सौरऊर्जेवर चालवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यापैकी आतापर्यंत सात हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सौरऊर्जा प्रकल्प आणि काही तांत्रिक उपाययोजनांमुळे सध्या राज्यातील ८० टक्के कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.

विजेच्या मागणीचे गणित काय?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रित पद्धतीने उभारलेले सौरऊर्जा प्रकल्प स्थानिक वीज उपकेंद्रांना वीजपुरवठा करतात. त्यामुळे या प्रकल्पांतून तयार झालेली वीज ग्रीडमधील मागणीच्या आकडेवारीत थेट दिसत नाही. याचप्रमाणे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरांच्या छतांवर बसवलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांतून तयार झालेली वीज घरातच वापरली जाते. त्यामुळे ग्रीडमधून घ्याव्या लागणाऱ्या विजेची गरज कमी होते. या दोन्ही योजनांतून उपलब्ध झालेली वीज विचारात घेतल्यास १० ऑक्टोबर रोजी राज्यातील विजेची प्रत्यक्ष एकूण मागणी ३८ हजार २१ मेगावॅट होती. यामुळे केवळ ग्रीडमधील मागणीचा आकडा पाहिल्यास राज्यातील विजेची एकूण गरज पूर्णपणे लक्षात येत नाही.

वीज उपलब्धतेसोबत खरेदीतही बचत

सौरऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे दिवसा विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी पारंपरिक स्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होत आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहकांना आणि कृषी पंपांना वीज उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे, तर दुसरीकडे वीज खरेदीवरील खर्चातही बचत होत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો