મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai news : दुष्काळग्रस्त बळीराजासाठी दिवाळी गोड होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रत्येक शेतकऱ्याला 5 हजार रुपयांच्या अग्रिम मदतीची मोठी घोषणा

Mumbai news :मुंबई :- राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे आणि ओढवलेल्या संकटांमुळे त्रस्त झालेल्या बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी घोषणा केली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

दुष्काळग्रस्त बळीराजासाठी दिवाळी गोड होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रत्येक शेतकऱ्याला 5 हजार रुपयांच्या अग्रिम मदतीची मोठी घोषणा
दुष्काळग्रस्त बळीराजासाठी दिवाळी गोड होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रत्येक शेतकऱ्याला 5 हजार रुपयांच्या अग्रिम मदतीची मोठी घोषणा

Mumbai news : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार; इतिहासात पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करत सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Mumbai news :मुंबई :- राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे आणि ओढवलेल्या संकटांमुळे त्रस्त झालेल्या बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना जाहीर केले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही रक्कम दिवाळीपूर्वीच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याने यंदा बळीराजाची दिवाळी अधिक गोड होणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या भूमिकेची सविस्तर माहिती दिली. गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर केला जात असे आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जात असे. परंतु, यंदा राज्य सरकारने अत्यंत वेगाने पावले उचलत ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळ जाहीर केला असून आज त्यासंदर्भातील सप्लीमेंटरी जीआर (शासन निर्णय) देखील जारी करण्यात आला आहे तसेच एकूण 12 योजना लागू करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची एक निश्चित कार्यप्रणाली असते आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊन ती मदत मिळण्यासाठी दिवाळीपूर्वीचा अवधी अपुरा पडू शकतो, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने स्वतःहून हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातून नियमांनुसार मिळणारी मदत मिळण्याआधी, शेतकऱ्यांच्या हातात सणासुदीच्या काळात काहीतरी आर्थिक हातभार असावा म्हणून ही अग्रिम (advance) रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો