મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026: मुख्यमंत्री फडणवीस आज मांडणार 'लेखाजोखा'; लाडकी बहीण आणि कर्जमाफीबाबत मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा

Maharashtra Budget News : दुपारी 2 वाजता अर्थसंकल्पीय वाचन | लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार?

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026: मुख्यमंत्री फडणवीस आज मांडणार 'लेखाजोखा'; लाडकी बहीण आणि कर्जमाफीबाबत मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा

Maharashtra Budget News : दुपारी 2 वाजता अर्थसंकल्पीय वाचन | लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार? | शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची डेडलाईन मिळणार? | 9 लाख कोटींच्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कसरत

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपला 12 वा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यावर सुमारे 9.32 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर असतानाही, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. Maharashtra Budget Latest News

अर्थसंकल्पातील 'हे' असतील मुख्य आकर्षण बिंदू

1.लाडकी बहीण योजना (Pay-out Hike?):
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500mरुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अलीकडेच झालेल्या पडताळणीत सुमारे 60 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याने, सरकार यातून वाचलेला निधी हप्ता वाढवण्यासाठी वापरणार का, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

2.शेतकरी कर्जमाफी (Loan Waiver):
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कालच विधानपरिषदेत संकेत दिले आहेत की, 30 जून 2026 पूर्वी राज्यात मोठी शेतकरी कर्जमाफी होऊ शकते. यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समिती एप्रिलमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. आजच्या अर्थसंकल्पात या कर्जमाफीसाठी भरीव निधीची तरतूद केली जाऊ शकते.

3 कृषी क्षेत्रासाठी 'AI'चा वापर:
महाराष्ट्र सरकारने नुकतेच 'Agri-AI' धोरण जाहीर केले आहे. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि हवामानाचा अंदाज देण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यासाठी विशेष तरतूद आजच्या बजेटमध्ये अपेक्षित आहे.

4.पायाभूत सुविधा आणि उद्योग:
'वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास आणि नवीन औद्योगिक कॉरिडॉरसाठी मोठ्या निधीची घोषणा होऊ शकते.

आर्थिक पाहणी अहवालातील सकारात्मक संकेत

गुरुवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, महाराष्ट्राचा विकास दर 7.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न 3.47 लाख रुपये असून ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. या सकारात्मक आकड्यांमुळे फडणवीस यांना काही नवीन योजना जाहीर करण्यासाठी बळ मिळू शकते.

શેર કરો