મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Raighad News : कर्जतनंतर आता महाडमध्येही वृक्षतोडीचा वाद! वारंगीतील अदानीच्या १५०० मेगावॉट प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; १५ हजार झाडांवर कुऱ्हाड पडण्याची भीती

Raighad News :रायगड : कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातही नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

कर्जतनंतर आता महाडमध्येही वृक्षतोडीचा वाद! वारंगीतील अदानीच्या १५०० मेगावॉट प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; १५ हजार झाडांवर कुऱ्हाड पडण्याची भीती
कर्जतनंतर आता महाडमध्येही वृक्षतोडीचा वाद! वारंगीतील अदानीच्या १५०० मेगावॉट प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; १५ हजार झाडांवर कुऱ्हाड पडण्याची भीती

Raighad News :रायगड : कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातही नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील वारंगी गावाजवळ प्रस्तावित असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीच्या १५०० मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Raighad News

या प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार झाडांची कत्तल होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील घनदाट जंगल, नैसर्गिक जलस्रोत आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हक्कांवरही परिणाम होण्याची भीती आहे.

दरम्यान, वरसगाव-वारंगी पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पर्यावरणविषयक तज्ज्ञ समितीने वनजमिनीच्या वाढलेल्या मागणीवर आणि संभाव्य पर्यावरणीय परिणामांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

एकीकडे राज्यात ऊर्जा निर्मिती आणि विकासाच्या नावाखाली मोठे प्रकल्प पुढे आणले जात असताना दुसरीकडे निसर्ग आणि स्थानिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वारंगीतील ग्रामस्थांच्या भूमिका, प्रशासनाची भूमिका आणि पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો