મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Lonavla News: अलिशान बंगला फोडून चौदा लाखांचा ऐवज लंपास

Lonavla News पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : लोणावळ्यातील वलवण परिसरातील एका आलिशान बंगल्याची गॅलरीचे दार तोडून चोरट्यांनी हिऱ्याचे-सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तब्बल चौदा लाख १५ हजार रुपयांचा ऐवज पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

अलिशान बंगला फोडून चौदा लाखांचा ऐवज लंपास लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिशान बंगला फोडून चौदा लाखांचा ऐवज लंपास लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Lonavla News : लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Lonavla News पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : लोणावळ्यातील वलवण परिसरातील एका आलिशान बंगल्याची गॅलरीचे दार तोडून चोरट्यांनी हिऱ्याचे-सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तब्बल चौदा लाख १५ हजार रुपयांचा ऐवज पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निलेश वर्तक (रा.सह्याद्री फार्म, गजल बंगलो, बाराबंगला (वलवण), लोणावळा) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Lonavla News

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील वलवण येथील रहिवासी निलेश वतर्क यांच्या बंगल्याच्या पाठीमागील कंपाऊंडवरून चोरट्याने आत उडी मारली. त्यानंतर पत्र्याच्या शेडवरून पुढील गॅलरीत येऊन, गॅलरीचा लाकडी दरवाजा कोणत्या तरी हत्याराने तोडून बंगल्यात प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले हिरे व सोन्याचे आणि एक लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण चौदा लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव याबाबत तपास करत आहेत.

શેર કરો