મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये १,१८४ किलो लाडू, बुंदीचा साठा जप्त करून नष्ट

Pune News :पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम सुरु असून कोंढव्यात तब्बल १,१८४ किलो लाडू, बुंदीचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये १,१८४ किलो लाडू, बुंदीचा साठा जप्त करून नष्ट
कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये १,१८४ किलो लाडू, बुंदीचा साठा जप्त करून नष्ट

Pune News :एफडीएची मोठी कारवाई; तपासणीत अतिरिक्त खाद्यरंगाचा अनिर्बंध वापर आणि स्वच्छतेच्या निकषांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्या

Pune News :पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम सुरु असून कोंढव्यात तब्बल १,१८४ किलो लाडू, बुंदीचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील ‘मेसर्स गायत्री लाडू भांडार’ या मिठाई उत्पादन आणि साठवणूक केंद्रावर एफडीएने ही कारवाई केली. यावेळी संबंधित केंद्राचा अन्न परवानाही निलंबित करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी के. व्ही. बारवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुखराज नगादराम चौधरी यांच्या ‘गायत्री लाडू भांडार’ केंद्राची अचानक पाहणी केली. तपासणीदरम्यान मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर संशय निर्माण झाल्याने, अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

कारवाईदरम्यान १ हजार ८ किलो मोतीचूर लाडू (किंमत १ लाख ५१ हजार २०० रुपये) आणि १८० किलो मोतीचूर बुंदी (किंमत २२ हजार ५०० रुपये) असा एकूण १ हजार १८८ किलो माल हस्तगत करण्यात आला. हा संशयास्पद साठा दिवाळीच्या काळात बाजारात विक्रीसाठी जाऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण जप्त साठा कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आला. तसेच, आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित केंद्राचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

दिवाळीच्या काळात मोतीचूर लाडू, बुंदी आणि अन्य गोड पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे उत्पादनात वापरले जाणारे खाद्यरंग, कच्च्या मालाचा दर्जा, कारखान्यातील स्वच्छता आणि साठवणुकीच्या पद्धती अत्यंत महत्त्वाच्या असतात. मात्र, कोंढव्यातील या उत्पादन केंद्राच्या तपासणीत अतिरिक्त खाद्यरंगाचा अनिर्बंध वापर आणि स्वच्छतेच्या निकषांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

नागरिकांसाठी एफडीएचे आवाहन
सणासुदीच्या आनंदात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही, असा सज्जड इशारा एफएफडीए प्रशासनाने दिला आहे. तसेच, फसवणूक टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी मिठाई किंवा इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना दुकानातील स्वच्छता, वस्तूंचा दर्जा आणि विक्रेत्याचा अन्न परवाना आवर्जून तपासावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून, पुणे विभागामार्फत करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો