મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Delhi News : रामलीला मैदानावरील रॅलीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; गर्दी दाखवण्यासाठी AI चा वापर केल्याचा किरेन रिजिजू यांचा आरोप

Delhi News :नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या रॅलीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

रामलीला मैदानावरील रॅलीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; गर्दी दाखवण्यासाठी AI चा वापर केल्याचा किरेन रिजिजू यांचा आरोप
रामलीला मैदानावरील रॅलीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; गर्दी दाखवण्यासाठी AI चा वापर केल्याचा किरेन रिजिजू यांचा आरोप

Delhi News :नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या रॅलीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या रॅलीला लाखो लोक उपस्थित असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रॅलीच्या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने गर्दी दाखवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर केल्याचा आरोप केला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

काँग्रेसने सोशल मीडियावर रामलीला मैदानावरील रॅलीचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत रिजिजू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “रामलीला मैदानावर मोठी गर्दी दाखवायची असेल, तर काँग्रेसने किमान AI च्या माध्यमातून तयार केलेली प्रतिमा तरी व्यवस्थित बनवायला हवी होती. काँग्रेसच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या टीमला पूर्ण भरलेले रामलीला मैदान दाखवणारी AI प्रतिमाही नीट तयार करता आली नाहीhttps://maharashtramirror.com/ Delhi News

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया आघाडीची रॅली


इंडिया आघाडीने रविवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली आयोजित केली होती. या रॅलीत काँग्रेससह आघाडीतील विविध पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. रॅलीपूर्वी सर्व नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर सर्व नेते खुल्या बसमधून मिंटो ब्रिजच्या दिशेने रवाना झाले. तेथून त्यांनी रामलीला मैदान गाठले. या खुल्या बसमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी एकत्र दिसले. राहुल गांधी बसच्या पुढील बाजूस बसले होते, तर प्रियांका गांधी मागील बाजूस बसलेल्या दिसल्या.

भाजपचा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरही निशाणा


दरम्यान, भाजपने या रॅलीवर टीका करताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात मतभेद असल्याचा दावाही केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रियांका गांधी यांना रॅलीमध्ये भाषण करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप केला.

त्यामुळे रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या रॅलीनंतर भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. रॅलीतील गर्दीच्या फोटोवरून AI चा वापर केल्याचा आरोप आणि गांधी भावंडांमधील कथित मतभेदांचा मुद्दा यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો