મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर शाळकरी मुलीला कंटेनर ट्रकने चिरडले

धनश्री ओतारी

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

4 મિનિટ વાંચન

कात्रज-कोंढवा रस्त्यावर शाळकरी मुलीला कंटेनर ट्रकने चिरडले
कात्रज-कोंढवा रस्त्यावर शाळकरी मुलीला कंटेनर ट्रकने चिरडले

Pune News : मृत मुलीचे वडील आणि बहीणही गंभीर जखमी; यानिमित्ताने बेशिस्त वाहनचालकांचा प्रश्न आणि त्यांना नियंत्रित ठेवण्यात वाहतूक पोलिसांचे अपयश आले ऐरणीवर

धनश्री ओतारी

Pune News पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता हा गेली कित्येक वर्षांपासून पादचारी आणि वाहनचालकांसाठी धोकेदायक ठरला आहे. ह्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे परंतु जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया खूप संथ गतीने होत असल्याने रुंदीकरण गेले कित्येक वर्षे रखडले आहे. दरम्यान, अनेक अपघातांत कित्येक लोक जखमी आणि मरण पावले आहेत. 'अजून किती निष्पाप लोकांचे बळी जाणार आहेत?' असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune news

या रस्त्यावर भीषण अपघात घडल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून तिचे वडील आणि बहीण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात आणि विशेषतः कात्रज-कोंढवा परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त दुचाकीचालक हे आपल्या मुलींना घेऊन उलट दिशेने निघाले होते.https://maharashtramirror.com/ Pune News

यानिमित्ताने पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांचा प्रश्न आणि त्यांना शिस्त लावण्यात वाहतूक पोलिसांना आलेले अपयश अधोरेखित होते. या घटनेवर काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक रहिवासी क्षमा कुलकर्णी म्हणाल्या, "कात्रज कोंढवा रस्त्यावर अतिशय मनमानी कारभार सुरू आहे. ना स्पीड ब्रेकर, ना वाहतूक पोलीस वाहनचालक कुठूनही कसेही उलटी सुलटी वाहने घेऊन जातात. कोणालाही कशाचीच भीती नाही. आज एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला."https://maharashtramirror.com/ pune News

आणखी एक नागरिक राहुल कदम म्हणाले, "पालकांची चुक आहे. शॉर्ट कट मारण्यासाठी विद्यार्थीनीचे वडिल उलट दिशेने आल्याने हा अपघात घडला. प्रशासनाची या अपघातामध्ये कोणतीही चूक नाही. पालकांनी गाडी चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे. हा वर्दळीचा रस्ता आहे.

नेमकी घटना काय घडली?
प्राप्त माहितीनुसार, पीडित शाळकरी मुलगी आपल्या वडिलांसोबत आणि बहिणीसोबत दुचाकीवरून शाळेत जात होती. नेहमीप्रमाणे सकाळी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. कात्रज-कोंढवा रस्त्यावरून उलट दिशेने जात असताना एका भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात चिमुकली गंभीररीत्या चिरडली गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिचे वडील आणि लहान बहीण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी व स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

जखमींवर उपचार आणि पोलिसांची कारवाई


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना व बहिणीला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवजड वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहनाची जप्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता बनला 'डेथ ट्रॅप'


कात्रज-कोंढवा रस्त्यावरील हा अपघात पहिलाच नसून या रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमुळे हा मार्ग प्रवाशांसाठी 'डेथ ट्रॅप' (मृत्यूचा सापळा) ठरत आहे. रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अनधिकृत पार्किंग, आणि विशेषतः अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक यामुळे येथे दररोज अपघाताचा धोका निर्माण होतो.

शाळेच्या वेळेत आणि गर्दीच्या तासांमध्ये अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी किंवा कडक नियम असणे आवश्यक असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही वाहने भरधाव वेगाने धावतात.

स्थानिक नागरिकांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा


या हृदयद्रावक घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. "प्रशासन आणखी किती निष्पापांचे बळी घेणार?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

स्थानिकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडे मागणी केली की कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. गर्दीच्या आणि शाळेच्या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालावी. अपघात प्रवण क्षेत्रांत (ब्लॅक स्पॉट्स) स्पीड ब्रेकर्स आणि वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी.

नागरिकांनी इशारा दिला आहे की जर या रस्त्यावरील सुरक्षेसंदर्भात प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. एका निष्पाप शाळकरी मुलीचा असा अंत झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत्यूचा सापळा
*मृत मुलीला आणि तिच्या बहिणीला त्यांचे वडील शाळेत घेऊन उलट दिशेने जात होते
*भरधाव वेगातील अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली
*नेहमीप्रमाणे सकाळी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती
*आजूबाजूच्या नागरिकांनी व स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ मदतीसाठी घेतली धाव; पोलिसांना कळवली घटनेची माहिती
*पोलिसांनी जखमींना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे
*अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवजड वाहनाच्या चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात, वाहनही केले जप्त
*तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा

कोट
"वेळेच्या बचतीसाठी किंवा शॉर्टकटच्या मोहात रॉंग साईडने गाडी चालवणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणे आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळू नका. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा, ट्रिपल सीटचा मोह टाळा आणि वेळेच्या मर्यादेचे काटेकोर पालन करा. कात्रज-कोंढवा रोडसारख्या तीव्र उताराच्या आणि जड वाहनांची वर्दळ असेलला महामार्ग आहे. त्या रस्त्यावर आम्ही जड वाहतुकीकरणास बंदी घालू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनीच प्रवास करताना काळजी घ्यावी." - संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे

શેર કરો