મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Kalyan Crime News : ‘अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या’ नवजात अर्भकाला कचऱ्यात फेकले; कल्याणमध्ये 22 वर्षीय तरुणाला अटक

Kalyan Latest Crime News : खडकपाडा पोलिसांकडून तपास, कचऱ्याच्या कुंडीतील बाळाच्या रडण्याने प्रकार उघडकीस

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Thane Crime News

Kalyan Latest Crime News : खडकपाडा पोलिसांकडून तपास, कचऱ्याच्या कुंडीतील बाळाच्या रडण्याने प्रकार उघडकीस

कल्याण :- कल्याणमधील बारावे गावातील एका कचरा कुंडीजवळ नवजात अर्भकाला बेवारस स्थितीत सोडून देणाऱ्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. रोहित प्रदीप पांडे (22 वय‌) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या या बाळाला पालकत्व लपवण्यासाठी कचराकुंडीत फेकल्याचे उघड झाले आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कल्याण न्यायालयाने आरोपी रोहित पांडेला पोलीस कोठडी सुनावली आहे. Kalyan Latest Crime News

कचऱ्याच्या कुंडीतील बाळाने उघड केले प्रकरण

रविवार, 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास बारावे गावातील शिवमंदिराजवळच्या कचरा कुंडीजवळ बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. पादचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, तिथे एक नवजात मुलगी रडत असल्याचे त्यांना आढळले. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, बाळाला सोडून देणाऱ्या तिच्या पालकांचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अल्पवयीन मुलीला शोधून काढले. तिने बाळ आपलेच असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रोहित पांडे याला अटक केली.

पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी रोहित पांडे विरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून, प्रसूतीनंतर रक्तस्राव झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणात आरोपी रोहित आणि अल्पवयीन मुलीची डीएनए (DNA) चाचणी केली जाणार आहे. तसेच, आरोपीच्या माता-पित्यासोबतच अल्पवयीन मुलीच्या आजीवरही कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

શેર કરો