Junnar Murder News : धक्कादायक! जुन्नरमध्ये लग्नाला नकार दिला म्हणून विद्यार्थिनीवर कोयत्याने भररस्त्यात हल्ला; आदिवासी वसतिगृहाबाहेरील घटनेने खळबळ
Pune Junnar Weeding Murder News : आरोपी महेश डामसे फरार, जुन्नर पोलिसांकडून कसून शोध सुरू; जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार
1 મિનિટ વાંચન

Pune Junnar Weeding Murder News : आरोपी महेश डामसे फरार, जुन्नर पोलिसांकडून कसून शोध सुरू; जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार
जुन्नर :- पुण्यातील जुन्नर शहरात एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेमुळे जुन्नर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. Junnar Weeding Murder News
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी संजय साळवे (18 वय) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. घटनेच्या दिवशी सकाळी गौरी नेहमीप्रमाणे वसतिगृहातून बाहेर पडली होती. ती सरकारी दवाखान्याच्या मागच्या बाजूने जात असताना, आरोपी महेश मुरलीधर डामसे तिथे दबा धरून बसला होता.
गौरी जवळ येताच महेशने तिला अडवले आणि काही समजण्यापूर्वीच आपल्याकडील धारदार कोयत्याने तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने गौरीच्या मानेवर आणि चेहऱ्यावर गंभीर वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गौरी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली.
नकाराचा सूड
गौरी आणि आरोपी महेश हे दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. महेशने काही काळापूर्वी गौरीला लग्नासाठी विचारले होते, मात्र गौरीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. याच गोष्टीचा राग महेशच्या मनात होता. "लग्नाला नकार दिला, याच रागातून त्याने माझ्यावर हल्ला केला," असा जबाब स्वतः जखमी गौरीने पोलिसांना दिला आहे.
स्थानिकांचे प्रसंगावधान
भरदिवसा घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ झाली. गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहताच वसतिगृहातील इतर विद्यार्थिनी आणि स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवून मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तातडीने तिला जुन्नर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी फरार, पोलीस पथके रवाना
हल्ला केल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला पकडण्यासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
