Jalgone News : बडतर्फ फौजदार निघाला दरोड्याचा मास्टरमाइंड
Jalgone News :जळगाव, प्रतिनिधी : बँकेत ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित असल्याचा विश्वास असतानाच जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला.
1 મિનિટ વાંચન

Jalgone News : कारागृहातच शिजवला स्टेट बँकेच्या लुटीचा कट; ३५ कोटींचे सोने, चांदी आणि रोकड लुटली, चार आरोपी जेरबंद
Jalgone News :जळगाव, प्रतिनिधी : बँकेत ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित असल्याचा विश्वास असतानाच जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला. विशेष म्हणजे, या दरोड्याचा मास्टरमाइंड बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक याने कारागृहात असतानाच दरोड्याचा कट रचल्याचे उघड झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे चारही आरोपींना अवघ्या दोन तासांत मुद्देमालासह पकडण्यात आले.https://maharashtramirror.com/Jalgone News
दरोडेखोरांनी गावात चादरी विकण्याच्या बहाण्याने बँकेच्या शाखेची रेकी केली होती. त्यानंतर दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींवरून हेल्मेट आणि मास्क घालून आलेले चार जण बँकेत घुसले. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजूला सारत बँकेत प्रवेश केला. त्यानंतर मॅनेजर आणि कॅशियरवर पिस्तूल रोखून त्यांना मारहाण केली. दोघांनाही खुर्चीला बांधून ठेवण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांनाही शस्त्रांचा धाक दाखवून हालचाल करण्यापासून रोखण्यात आले.https://maharashtramirror.com/Jalgone News
१६ लॉकर फोडून ऐवज बॅगांमध्ये भरला
बँकेतील परिस्थिती नियंत्रणात घेतल्यानंतर दरोडेखोरांनी एकूण १६ लॉकर फोडले. त्यातील सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड सहा बॅगांमध्ये भरली. लुटलेल्या ऐवजाची किंमत अंदाजे ३५ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले.
अलार्म वाजताच ग्रामस्थांचा पाठलाग
दरोडेखोरांनी बँकेतून पळ काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी अलार्म वाजवला. आवाज ऐकताच ग्रामस्थांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत पोलीस पाटलांच्या मदतीने आसपासच्या अनेक गावांमध्ये नाकाबंदी केली. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून चारही आरोपींना अवघ्या दोन तासांत लुटलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
