મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

महानगरपालिकेमध्ये प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमावा लागतो ही शोकांतिका : उज्ज्वल केसकर

सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करण्याची मागणी

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

महानगरपालिकेमध्ये प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमावा लागतो ही शोकांतिका : उज्ज्वल केसकर

सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करण्याची मागणी

निलेश राऊत

पुणे: पुणे महापालिकेमध्ये सध्या सल्लागारांचा सुळसुळाट झालेला आहे. आज प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमावा लागतो ही शोकांतिका आहे. अशी खंत माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी व माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले. ते म्हणाले, या पुढच्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करावे व त्यांच्यावर विश्वास टाकावा त्यामुळे खो-खोचा खेळ थांबेल. ते म्हणाले सल्लागार संस्थेकडे तज्ञ नसतात. ते त्यांचे फक्त प्रोफाईल दाखल करतात. त्यामुळे त्यांच्याकडे महापालिकेने पे रोल वरील व्यक्तींची मागणी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये अनेक तज्ञ इंजिनियर असताना आपण सल्लागार का नेमतो हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये आहे. तर महापालिकेचे अधिकारी सक्षम असताना सल्लागार नेमून आपण जबाबदारी का झटकत आहोत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

It is a tragedy that a consultant has to be appointed for every work in the Municipal Corporation: Ujjwal Keskar

શેર કરો