IPL 2026 : 'इंडिया का त्योहार' आजपासून सुरू! सलामीलाच चॅम्पियन बंगळुरू विरुद्ध हैदराबादचा थरार
IPL Match Latest News : 19 व्या हंगामाचे बिगुल वाजले; वानखेडेवर रंगणार मुंबई-चेन्नई महामुकाबला, धोनीचा शेवटचा सामना असण्याची शक्यता
2 મિનિટ વાંચન

IPL Match Latest News : 19 व्या हंगामाचे बिगुल वाजले; वानखेडेवर रंगणार मुंबई-चेन्नई महामुकाबला, धोनीचा शेवटचा सामना असण्याची शक्यता
IPL 2026, RCB vs SRH :- जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 19वा हंगाम आज, शनिवारपासून (28 मार्च 2026) दिमाखात सुरू होत आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सलामीच्या लढतीत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
भारताने नुकताच न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्याने देशात क्रिकेटचे वातावरण आधीच तापलेले आहे. आता आयपीएलच्या निमित्ताने पुढील दोन महिने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे.
सलामीचा सामना: पाटीदार विरुद्ध हैदराबाद
गतविजेत्या बंगळुरू संघाचे नेतृत्व यंदा रजत पाटीदार करत आहे. घरच्या मैदानात हैदराबादला रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. बीसीसीआयने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला केवळ 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र आता संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वानखेडेवर मुंबई-चेन्नई द्वंद्व; धोनीचा 'लास्ट डान्स'?
आयपीएलमधील सर्वात मोठी शत्रुता मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात यंदा दोन सामने रंगणार आहेत.
23 एप्रिल: वानखेडे स्टेडियम, मुंबई (महेंद्रसिंह धोनीचा वानखेडेवर हा शेवटचा सामना ठरू शकतो).
2 मे: चेपॉक स्टेडियम, चेन्नई.
विशेष म्हणजे, यंदा विराट कोहलीचा बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात केवळ एकच लढत 5 एप्रिल रोजी होणार आहे.
मुंबई इंडियन्सचे वानखेडेवरील अभियान
मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. यंदा राजस्थान आणि पंजाबचे संघ वानखेडेवर मुंबईशी भिडणार आहेत.
वानखेडेवर होणारे महत्त्वाचे सामने
मुंबई वि. कोलकाता (29 मार्च, 7.30 वा.)
मुंबई वि. बंगळुरू (12 एप्रिल, 7.30 वा.)
मुंबई वि. पंजाब (16 एप्रिल, 7.30 वा.)
मुंबई वि. चेन्नई (23 एप्रिल, 7.30 वा.)
स्पर्धेचे स्वरूप आणि बाद फेरी
दोन गट: 10 संघांची दोन गटांत विभागणी केली आहे, मात्र गुणतालिका एकच असेल.
गट 1 : चेन्नई, कोलकाता, राजस्थान, बंगळुरू, पंजाब.
गट 2 : मुंबई, हैदराबाद, गुजरात, दिल्ली, लखनऊ.
बाद फेरी: साखळी फेरी 24 मे रोजी संपेल. त्यानंतर 26 मे पासून बाद फेरीला सुरुवात होईल आणि 31 मे 2026 रोजी महाअंतिम सामना रंगेल.
