हवेली तालुक्यातील आंबेगावात फळझाडांच्या नुकसानीचा जाब विचारल्याचा राग सख्ख्या मोठ्या भावाकडून धाकट्या भावाला लाकडी काठीने बेदम मारहाण
पुणे : फळझाडांचे गुरांनी नुकसान केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
1 મિનિટ વાંચન

पुणे : फळझाडांचे गुरांनी नुकसान केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अनंता रामभाऊ ढेबे (वय ५२ वर्षे, रा. आंबी, ता. हवेली) यांनी आपला सख्खा भाऊ बापू ढेबे याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनंता ढेबे आणि आरोपी बापू ढेबे हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये पूर्वीपासून शेती आणि कौटुंबिक कारणावरून अंतर्गत वाद सुरू होते. बुधवार (ता. २७ मे) सकाळच्या सुमारास आंबेगाव येथील शेतामध्ये फिर्यादी अनंता ढेबे हे काम करत होते. त्यावेळी आरोपी भाऊ बापू ढेबे यांची पाळीव गुरे अनंता यांच्या शेतात शिरली आणि त्यांनी तेथील फळझाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या नुकसानीचा जाब विचारण्यासाठी अनंता हे बापू यांच्याकडे गेले असता, त्यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला. यावेळी बापू ढेबे यांनी स्वतःच्या हातातील गुरे हाकण्याची लाकडी काठी घेऊन अनंता यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले व अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली.
हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मारगे या गंभीर कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत.
