મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Health News: होमिओपॅथिक डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्र मिळणार

होमिओपॅथिक डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्र मिळणार

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे.
होमिओपॅथिक डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्र मिळणार सकारात्मक निर्णयाने मिळाला दिलासा.

सकारात्मक निर्णयाने मिळाला दिलासा

पुणे,महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर सकारात्मक निर्णय झाल्याने हजारो पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. याचा लाभ राज्याच्या आरोग्य व्यवस्थेलाही होणार आहे. (maharashtra Mirror) https://maharashtramirror.com/


याबाबत बोलताना होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी सांगितले की, “सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याचा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. ( maharashtra mirror)


गेले अनेक वर्ष हा लढा सुरू होता. डॉक्टरांनी २०१२ पासून अनेक आंदोलन केली. सन २०१४ मध्ये सरकारने होमिओपॅथिक डॅक्टरांच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. हा अभ्यासक्रम २०१६ पासून विद्यापीठात शिकवायला सुरूवात झाली. राज्यभरातून सुमारे बारा हजार विद्याथीर् बाहेर पडलले आहेत. परंतु प्रॅक्टिस करण्यासाठी कायदेशीर अडचणी येत होत्या. तथापि सरकारने नोंदणी प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिल्याने डॅक्टरांना दिलासा मिळाला आहे. पात्र डॉक्टरांना लवकर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात यावे. जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टर तसेच विविध आयुष शाखांतील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतील, असे गायकवाड यांनी सांगितले. (Mharashtra mirror)

શેર કરો