મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Health News : अत्याधुनिक ‘२-डी इको’ मुळे बालकांमधील हृदयविकाराचे अचूक निदान होणार

पुणे, महाराष्ट्र मिरर Health News : ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) यांनी अत्याधुनिक २-डी इकोकार्डिओग्राफी मशिन भेट दिले आहे.

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

Health News : अत्याधुनिक ‘२-डी इको’ मुळे बालकांमधील हृदयविकाराचे अचूक निदान होणार

फिनोलेक्सकडून ससूनच्या नवजात अतिदक्षता विभागाला मशिन भेट

पुणे, महाराष्ट्र मिरर Health News : ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) यांनी अत्याधुनिक २-डी इकोकार्डिओग्राफी मशिन भेट दिले आहे. या उपकरणामुळे नवजात बालकांमधील जन्मजात हृदयविकारांचे निदान अधिक अचूक, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येणार असून, वेळेत उपचार सुरू करण्यास मोठी मदत होणार आहे.Health News

या मशिनचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किनीकर, डॉ. राहुल डावरे, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मंगेश मांतिरी आणि योगेश आपुकर, तसेच मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी आणि यास्मिन शेख उपस्थित होते.

यापूर्वी फिनोलेक्स आणि एमएमएफ यांच्या सीएसआर उपक्रमातून एनआयसीयूसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले २-डी इको मशीन तब्बल नऊ वर्षे अखंडपणे वापरात होते. त्याचे तांत्रिक आयुष्य पूर्ण झाल्याने आता त्याऐवजी नव्या अत्याधुनिक मशिनची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विभागातील निदान सुविधा अधिक सक्षम आणि अद्ययावत झाली आहे.Health News

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी २०१७ पासून ससून रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागाच्या उन्नतीसाठी सातत्याने योगदान दिले आहे. या सहकार्यांतर्गत ५९ खाटांचे अत्याधुनिक एनआयसीयू विकसित करण्यात आले असून, अनुभवी नवजात तज्ज्ञांची नियुक्ती, डॉक्टर आणि परिचारिकांचे नियमित प्रशिक्षण, आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याबरोबरच प्रत्येक नवजात बालकाला आयुष्याच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने राबविण्यात आलेला फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

नवजात बालकांना मिळणार अचूक आणि वेळेत उपचार

सध्या एनआयसीयूमध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी (ROP) तपासणी, ओटोअॅकॉस्टिक एमिशन (OAE) श्रवण चाचणी, जन्मजात हृदयविकार तपासणी, ह्युमन मिल्क बँक तसेच अत्याधुनिक जीवनरक्षक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. नव्याने बसविण्यात आलेल्या २-डी इको मशीनमुळे दरमहा सुमारे १५० नवजात बालकांना अधिक दर्जेदार, अचूक आणि वेळेवर निदानाची सुविधा मिळणार असून त्यांच्या उपचारांमध्ये मोठी मदत होणार आहे.Health News

Health News

શેર કરો