મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Goyal Developers : मुंढवा येथील सुभाष गोयल समुह प्रकल्पाला एक लाखाचा दंड

पुणे, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

1 મિનિટ વાંચન

Goyal Developers

Goyal Developers : महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालायाकडून कारवाई

पुणे, महाराष्ट्र मिरर

Goyal Developers : मुंढवा येथील हडपसर स्टेशन रोडवरील सुभाष गोयल समुह प्रकल्पाच्या बांधकाम साईडवर खोदाई काम केलेल्या खाड्यांमधील पाणी रस्त्यावर सोडल्या प्रकरणी, महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालायाकडून सुभाष गोयल समुह प्रकल्पाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. Goyal Developers

याबाबत महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना सांगितले की, सुभाष गोयल समुह प्रकल्पाच्या बांधकाम साईडच्या परिसरातील नागरिकांनी सदर बिल्डर खाडी खोदायीतील पाणी रस्त्यावर सोडत असून त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालायाचे आरोग्य निरीक्षक संतोष ताटकार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील तंवर यांनी प्रतक्ष जागेवर जाऊन ७ जुलै रोजी पाहणी केली. Goyal Developers Water Supply : पुणेकरांनो अजून दोन तीन दिवस तरी गढूळ पाणीच भरा ! तेव्हा आपल्या बांधकाम साईडवर खोदाई काम केलेल्या खाड्यांमधील पाणी सदर बिल्डर विनापरवाना पुणे मनपाच्या पावसाळी लाईन/सार्वजनिक रस्त्यावर सोडत असल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले. सदर ठिकाणी पाणी सोडल्याने परिसरात अनारोग्य परिस्थिती निर्माण होत होती. तर सदर परिसरातील पावसाळी लाईन चोकअप होऊन सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छ पाणी येऊन आरोग्प विघातक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती. Goyal Developers Moshi Tragedy : कचरा प्रकल्पांच्या टेंडरवरून महापालिकेत घमासान त्यामुळे आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण करणे हे महाराष्ट्र महापातिका अधिनियम १९४९ अन्वये कायदेशीर गुन्हा असल्याने, सुभाष गोयल समुह प्रकल्पाला एक लाखाचा दंड (प्रशासकीय शुल्क) याकरण्यात येणार असल्याची नोटीस १४ जुलै रोजी बाजविण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून २ दिवसात ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय, ढोले पाटील रोड येथे ही दंड शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे. Goyal Developers

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો