મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू

Pune News : पुणे: पुण्यातील घोरपडी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने मृत्यू
घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने मृत्यू

Pune News : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने मृत्यू

Pune News : पुणे:पुण्यातील घोरपडी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका १८ वर्षीय तरुण हलगी वादकाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने मृत्यू झाला.https://maharashtramirror.com/ Pune News

विघ्नेश पवार असे या मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, या अपघातामुळे घोरपडी परिसर आणि स्थानिक गणेश मंडळांमध्ये शोककळा पसरली. पुणे शहरातील बी. टी. कवडे मार्ग परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत अनेक तरुण पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहाने सहभागी झाले होते. मृत विघ्नेश पवार हा देखील एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत हलगी वाजवण्याचे काम करत होता. मिरवणूक पुढे सरकत असताना, काही वेळ विश्रांतीसाठी किंवा बसण्यासाठी विघ्नेश हा गणेश मंडळाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या मागील बाजूस जाऊन बसला होता. https://maharashtramirror.com/ Pune News

मिरवणूक सुरू असतानाच जेव्हा ती घोरपडी येथील काळूबाई चौक परिसरात पोहोचली, तेव्हा अचानक एक भीषण प्रसंग घडला. ट्रॉलीच्या मागे बसलेल्या विघ्नेशचा अचानक समतोल बिघडला आणि तो थेट धावत्या ट्रॉलीच्या चाकाखाली आला. मिरवणुकीतील प्रचंड गर्दी आणि आवाजामुळे सुरुवातीला हा प्रकार कोणाच्या चटकन लक्षात आला नाही, मात्र तो चाकाखाली आल्याचे पाहताच उपस्थितांनी एकच गोंधळ केला आणि ट्रॅक्टर थांबवला.

या अपघातात विघ्नेश गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला तातडीने घटनास्थळावरील नागरिकांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात एका तरुण कलाकाराचा असा अपघाती अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, मिरवणुकीतील वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો