મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE CRIME : खराबवाडीत ३० हजारांच्या गांजा जप्त

एकाला अटक; दोघे फरार

મ
મુબારક

1 મિનિટ વાંચન

PUNE CRIME : खराबवाडीत ३० हजारांच्या गांजा जप्त

एकाला अटक; दोघे फरार

पुणे, महाराष्ट्र मिरर : गुन्हे शाखेच्या पथकाने खराबवाडी येथे छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला गांजासह रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (१७ जून) रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील इंडक्शन हीट कंपनीच्या युनिट २ च्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.

याबाबत गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस कॉन्स्टेबल रामदास मेरगळ यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धोंडीबा ज्ञानदेव सारगे (२८, खराबवाडी, मूळ रा.निलंगा, लातूर) याला अटक करण्यात आली असून समीर सरवर तडवी (२५, खराबवाडी) व रोहन गायकवाड (बीडवस्ती, चाकण) हे दोघे फरार आहेत.

તસવીરો · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोंडीबा सारगे हा अवैधरितीने विक्री करण्यासाठी ३० हजार ९५० रुपये किमतीचा ६१९ ग्रॅम वजनाचा गांजा स्वतःच्या ताब्यात बाळगून असताना पोलिसांना आढळला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हा गांजा फरार आरोपी समीर आणि रोहन यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. Ganja worth ₹30,000 seized in Kharabwadi

શેર કરો