Ganeshotsav 2026 च्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत मोठे बदल
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

Ganeshotsav 2026 : १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान मध्यवर्ती भागातील प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद; गणेशमूर्ती खरेदीसाठी विशेष पार्किंग व्यवस्था
पुणे, महाराष्ट्र मिरर
Ganeshotsav 2026 : श्री गणपती बाप्पांच्या आगमनाची आणि प्रतिष्ठापनेची लगबग सुरू झाली असून, गणेशमूर्ती खरेदीसाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून १२, १३ आणि १४ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत वाहतुकीत महत्त्वपूर्ण तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. Ganeshotsav 2026

हे बदल दररोज सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवाजी रोडवर वाहतूक पूर्णपणे बंद
गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा छत्रपती शिवाजी रोडवरील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग
गाडगीळ पुतळा चौक → संताजी घोरपडे पथ → कुंभारवेस चौक → शाहीर अमर शेख चौक.
शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स. गो. बर्वे चौक → जंगली महाराज रोड → खंडोजीबाबा चौक → टिळक चौक हा मार्ग वापरता येईल. Ganeshotsav 2026
झाशी राणी चौक → खुडे चौक → डेंगळे पूल मार्गे कुंभारवेसकडे जाता येईल.
मंगला सिनेमा लेन → कुंभारवेस → प्रीमियर गॅरेज चौक → शिवाजी पूल चौक → गाडगीळ पुतळा चौक → कुंभारवेस चौक.

सिंहगड रोडवर पार्किंगला बंदी
सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, या मार्गावर वाहनांचे पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Pune News : भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलत
उपलब्ध पार्किंग व्यवस्था
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा
जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक — रस्त्याच्या डाव्या बाजूस
निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन
केशवनगर-मुंढवा परिसरातही वाहतुकीत बदल
केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे जाणारी वाहने मांजरी रोडऐवजी गायरान वस्ती रोड → विहान सोसायटी रोड → मांजरी रोड या मार्गाचा वापर करतील.
खराडी ब्रिजकडून येणारी वाहने रेणुका माता मंदिर → विहान सोसायटी रोड → शिवाजी महाराज चौक या मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
जड वाहनांना प्रवेशबंदी
मुंढवा चौक–शिवाजी चौक ते कल्याणी बंगला रोड तसेच शिवाजी चौक ते झेड कॉर्नर, केशवनगर परिसरात जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
गणपती मूर्ती खरेदीसाठी विशेष पार्किंग व्यवस्था Ganeshotsav 2026
गणेशमूर्ती खरेदीसाठी मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती रानडे पथ — कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा
वीर संताजी घोरपडे पथ — मनपा बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक
टिळक पूल ते भिडे पूल — नदीपात्रातील रस्ता
मंडई परिसरातील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळ
शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक — केवळ रस्त्याच्या डाव्या बाजूस पार्किंग
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, वाहन रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क करू नये आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Ganeshotsav 2026
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
