Pune Crime : मकोका गुन्ह्यातील श्रीकांत पवारला दीड वर्षांनंतर बेड्या
Pune Crime पुणे: कुख्यात गुंड गजानण मारणे टोळीचा सक्रिय सदस्य आणि 'मकोका' सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने शिताफीने जाळ्यात पकडून जेरबंद केले आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune Crime : कुख्यात गजानण मारणे टोळीचा फरारी साथीदार
Pune Crime पुणे: कुख्यात गुंड गजानण मारणे टोळीचा सक्रिय सदस्य आणि 'मकोका' सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने शिताफीने जाळ्यात पकडून जेरबंद केले आहे. श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार (वय ३९, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. https://maharashtramirror.com/ Pune crime
वाडे बोलाई येथे वेढा घालून कारवाई
कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शोध घेत असताना, पोलीस अंमलदार अतुल साठे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीची पक्की माहिती मिळाली.https://maharashtramirror.com/ Pune crime
आरोपी श्रीकांत पवार हा वाडे बोलाई (ता. हवेली) येथील 'अपनाघर सोसायटी'च्या सी-विंगमधील फ्लॅट नंबर ६०१ मध्ये त्याच्या मित्रासोबत लपून राहत असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच पोलिसांनी तत्काळ योजना आखली. पोलिसांच्या पथकाने राहत्या घराला सर्व बाजूंनी वेढा घातला आणि पळून जाण्याची कोणतीही संधी न देता त्याला जागेवरच ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Pune crime
पुढील तपासासाठी हस्तांतरित
अटक केलेला आरोपी श्रीकांत पवार याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अन्वये विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा ०१) शैलेश संख्ये यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपास पथक
ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संख्ये यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार राजेंद्र नलावडे, अतुल साठे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, तुषार किंद्रे, विपुल गायकवाड आणि आशिष राठोड यांच्या पथकाने पार पाडली.
