Mumbai News : थकीत बिलांमुळे कंत्राटदार गजानन देवकाते यांची आत्महत्या
Mumbai News : मुंबई : मुंबईत सरकारी कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
1 મિનિટ વાંચન

Mumbai News : मुंबई महापालिकेचे सुमारे २ कोटींचे काम
Mumbai News : मुंबई : मुंबईत सरकारी कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काम पूर्ण करूनही सुमारे दोन कोटी रुपयांचे बिल थकीत राहिल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. या आर्थिक आणि मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.https://maharashtramirror.com/
देवकाते यांनी मुंबई महापालिकेचे सुमारे दोन कोटी रुपयांचे काम पूर्ण केले होते. मात्र, कामाचे पैसे वेळेत मिळत नसल्याने त्यांना वारंवार संबंधित कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. बिलासाठी तब्बल दहा वेळा चकरा माराव्या लागल्याचा उल्लेख त्यांनी वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. https://maharashtramirror.com/
“काम करूनही पैसे मिळत नसतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?” असा सवालही त्यांनी या पत्रातून उपस्थित केल्याची माहिती आहे. कंत्राटदार म्हणून काम करण्यासाठी स्वतःची गुंतवणूक तसेच कर्जाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही देयके रखडल्याने आर्थिक ताण वाढत असल्याची समस्या कंत्राटदारांकडून सातत्याने मांडली जात आहे.
देवकाते यांच्या आत्महत्येमुळे राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानेही या घटनेवर चिंता व्यक्त केली असून, राज्यातील विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणावर देयके प्रलंबित असल्याचा दावा केला आहे. https://maharashtramirror.com/wp-admin
