મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सक्तीच्या भूसंपादनाचे हत्यार

संपूर्ण प्रक्रिया २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सक्तीच्या भूसंपादनाचे हत्यार

संपूर्ण प्रक्रिया २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

निलेश राऊत
पुणे: बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिका 'सक्तीने भूसंपादन' करआहे. ही प्रक्रिया पुढील दोन दिवसांत सुरू करून संपूर्ण प्रक्रिया २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती भूसंपादन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली. गेली कित्येक वर्षे भूसंपादन अभावी हा रस्ता रखडला होता. शेवटी महापालिकेने सक्तीने भूसंपादन हे हत्यार उपसले आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरून सोलापूर, सासवड, फलटण, मुंबई, कोकण, साताऱ्याकडे जड आणि हलक्या वाहनांची मोठ्याप्रमाणात ये-जा होते. शिवाय रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीत वाढ होऊन वाहतूककोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने कात्रज-कोंढवा (खडी मशीन चौक) रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदाही काढण्यात आली. मात्र, वाढीव निविदेवरून हा रस्ता सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला.

दरम्यान, प्रकल्पासाठी किमान ८० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय प्रशासनाकडून त्याचे काम सुरू केले जात नाही. मात्र, निम्मेही भूसंपादन झालेले नसताना केवळ २०१९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आचारसंहिते पूर्वी घाईने भूमिपूजन उरकले होते.

पुढील दोन दिवसांत प्रक्रिया सुरू
भूसंपादनाचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरी भूसंपादन कायद्यानुसार जागा मालकांना बाजार भावाच्या दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी कात्रज, कोंढवा आणि कोंढवा औद्योगिक, असे तीन विभाग करून दर निश्चित केले आहेत. कात्रजमध्ये २५,६६७रुपये, कोंढव्यात २४,६५७ रुपये आणि औद्योगिक भागात १९,६९८ रुपये प्रति चौरस मीटर दर ठरविण्यात आला आहे.

सात वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे भूसंपादनासाठी अखेर पालिकेने सक्तीचे भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया दोन दिवसांत सुरू करून संपूर्ण प्रक्रिया दि. २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोरे यांनी सांगितले.

શેર કરો