મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Dubai News : फ्लायदुबई हल्ला: ओमानच्या सह-वैमानिकाचे अतिरेकी विचार

Dubai News :दुबई/तेल अवीव: ‘फ्लायदुबई’ विमानात भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-वैमानिकाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

फ्लायदुबई हल्ला: ओमानच्या सह-वैमानिकाचे अतिरेकी विचार
फ्लायदुबई हल्ला: ओमानच्या सह-वैमानिकाचे अतिरेकी विचार

Dubai News : हमाम अल-हमामी याला ओमान एअरने आधीच सेवामुक्त केले होते

Dubai News :दुबई/तेल अवीव: ‘फ्लायदुबई’ विमानात भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-वैमानिकाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. हमाम अल-हमामी असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या सोशल मीडिया खात्यांवरून आणि कामाच्या पार्श्वभूमीवरून त्याचे कट्टरतावादी व मूलतत्त्ववादी विचार स्पष्ट झाले आहेत.https://maharashtramirror.com/ Dubai News

सीएनएनच्या विश्लेषणानुसार, अल-हमामीने २०२१ आणि २०२२ मधील सुमारे ३,००० डिलीट केलेल्या पोस्टमध्ये महिला, धर्म आणि कामाच्या ठिकाणाबद्दल अत्यंत टोकाचे विचार मांडले होते. त्याच्या एका पोस्टमध्ये, त्याने लग्नासाठी पत्नीने पूर्ण चेहरा झाकणारा ‘निकाब’ घालावा आणि लग्नानंतर नोकरी सोडावी, अशा अटी ठेवल्याचा उल्लेख होता. तसेच, स्त्री-पुरुषांनी एकत्र काम केल्याने महिलांचे नैतिक अधःपतन होते, असा दावाही त्याने केला होता. https://maharashtramirror.com/ Dubai News

ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनी ‘ओमान एअर’ मध्ये त्याने सात वर्षे काम केले होते. मात्र, त्याच्यातील कट्टरतावादी विचारांमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याला गेल्या वर्षी उड्डाण प्रशिक्षणावरून हटवून नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर तो अत्यंत कमी कालावधीसाठी इतर विमान कंपन्यांमध्ये आणि अवघ्या आठ महिनंपूर्वीच फ्लायदुबईमध्ये रुजू झाला होता.

घटनेच्या अवघ्या काही तासांनंतर त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलवर विमानाच्या कॉकपिटमधील व्हिडिओ आणि अल-कायदाशी संबंधित दहशतवाद्यांचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या तपास यंत्रणा आणि इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय दहशतवादी कट होता का, याचा शोध घेत आहेत.

फ्लायदुबई विमानातील घटनेप्रकरणी यूएईच्या ॲटर्नी जनरल कार्यालय, मोसाद आणि सुरक्षा एजन्सी ‘शिन बेट’ पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चौकशी करत आहेत. युएईच्या मुख्य न्यायव्यवस्थेने या घटनेला अधिकृतपणे ‘दहशतवादी कृत्य’ म्हणून घोषित केले आहे. सह-वैमानिक हमाम अल-हमामी याने कॉकपिटमधील इमर्जन्सी कुऱ्हाडीचा वापर करून विमानाचा ताबा घेण्याचा आणि ते इस्रायलमध्ये क्रॅश करण्याचा प्रयत्न केला होता का, यादृष्टीने तपास सुरू आहे.

अल-हमामीने एकट्यानेच हे कृत्य केले की त्याला अल-कायदासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांकडून किंवा इतर कोणत्याही मूलतत्त्ववादी नेटवर्ककडून सूचना व पाठबळ मिळाले होते, याचा शोध घेतला जात आहे.

त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून डिलीट करण्यात आलेल्या हजारो पोस्ट, सीरियातील वास्तव्यादरम्यान झालेली कट्टरतावादी विचारसरणीची प्रक्रिया आणि घटनेनंतर त्याच्या लिंक्डइन खात्यावरून पोस्ट करण्यात आलेले अल-कायदाचे व्हिडिओ व एआय चित्रे यांचा डिजिटल तपास सुरू आहे. हे व्हिडिओ कोणी पोस्ट केले किंवा ते आधीच शेड्यूल केले होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
ओमान आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध नसताना, तसेच २०२४ मध्येच कट्टरतावादी विचारांमुळे ओमान एअरमधून काढून टाकले गेले असतानाही अल-हमामीला तेल अवीवकडे जाणाऱ्या उड्डाणावर सह-वैमानिक म्हणून कसे नियुक्त केले गेले? इस्रायलच्या ‘शिन बेट’ व हवाई सुरक्षा यंत्रणा या गंभीर सुरक्षेच्या चुकीची चौकशी करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો