મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

मोशीयेथे विहिरीत पडलेल्या मोराची अग्निशमन दलाने केली सुटका

भटक्या कुत्र्याच्या पाठलागामुळे पडला पक्षी विहिरीत

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

मोशीयेथे विहिरीत पडलेल्या मोराची अग्निशमन दलाने केली सुटका

भटक्या कुत्र्याच्या पाठलागामुळे पडला पक्षी विहिरीत

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील कुदळे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्याच्या पाठलाग मुळे एक मोरे विहिरीत पडल्याची घटना घडली होती.

मोर जखमी होऊन खोल विहिरीत पडल्याने त्याला विहिरी बाहेर येता येत नव्हते. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मोराची सुखरूप विहिरीतून सुटका केली आहे. रस्सी आणि प्लास्टिक बॉक्सच्या साह्याने मोराला विहिरीच्या बाहेर काढून अग्निशमन दलाने त्याची सुखरूप सटका केली आहे. त्याला पुढील उपचारासाठी कात्रज च्या प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आला आहे.

શેર કરો