મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

FDA Milk Raidसोनई डेअरीवर एफडीएची छापेमारी - शोल्डर

पुणे, महाराष्ट्र मिरर FDA Milk Raid: पुणे जिल्ह्यातील नामांकित ब्रँड असलेल्या इंदापूर येथील सोनाई डेअरी येथे महाराष्ट्र अन्न व औषध (FDA) प्रशासनाने मोठी छापेमारी केली आहे.

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

FDA Milk Raidसोनई डेअरीवर एफडीएची छापेमारी - शोल्डर

कारवाई पूर्ण झाल्यानंतरच माहिती देणार

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची माहिती

पुणे, महाराष्ट्र मिरर FDA Milk Raid: पुणे जिल्ह्यातील नामांकित ब्रँड असलेल्या इंदापूर येथील सोनाई डेअरी येथे महाराष्ट्र अन्न व औषध (FDA) प्रशासनाने मोठी छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, संबंधित कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आम्ही पूर्ण माहिती देऊ असे स्पष्ट केले.FDA Milk Raid

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएची राज्यभर भेसळयुक्त दूधविरोधी विशेष मोहिम सुरू आहे.एफडीएने अलीकडच्या काळात राज्यभर कृत्रिम व भेसळयुक्त दुधाविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत दूध संकलन केंद्रे, डेअरी, चिलिंग प्लांट आणि पुरवठा साखळीतील विविध ठिकाणी एकाचवेळी तपासण्या सुरू आहेत. काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात संशयित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत.FDA Milk Raid

सोनाई डेअरीवरील तपासणीनंतर नमुन्यांचे प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या ही कारवाई तपासाचा भाग असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे

FDA Milk Raid

શેર કરો