वाहन क्रमांक आरक्षणासाठी फेसलेस सेवा सुरू
इल्लस्ट्रेशन वापरा १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी दु.
1 મિનિટ વાંચન

इल्लस्ट्रेशन वापरा
१० एप्रिल २०२६ रोजी दुपारी दु. ४ वाजल्यापासून
नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांना या सेवेचा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून लाभ घेता येईल
તસવીરો · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
पुणे, एप्रिल १०, महाराष्ट्र मिरर: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी दु. ४ वाजल्यापासून सुरू झाली आहे.
ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांना या सेवेचा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून लाभ घेता येईल.
फेसलेस सेवा कार्यान्वित असून, अर्जदार आधार लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नव्याने सुरू होणाऱ्या ‘एमएच12झेडएन’ मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक अर्जदारांना आरक्षित करता येतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
Faceless service launched for vehicle number reservation
