મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : नेस्को सेंटरच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार पलटवार; "आम्ही ऑपरेशन करतो, पण ते जनतेच्या हिताचे असते!"

Mumbai News :मुंबई :- विजयादशमीच्या निमित्ताने गोरेगाव येथील नेस्को सेंटरच्या मैदानावर पार पडलेल्या शिवसेनेच्या महामेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक आणि आंदोळनकारी फटकेबाजी केली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

नेस्को सेंटरच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार पलटवार; "आम्ही ऑपरेशन करतो, पण ते जनतेच्या हिताचे असते!"
नेस्को सेंटरच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार पलटवार; "आम्ही ऑपरेशन करतो, पण ते जनतेच्या हिताचे असते!"

Mumbai News :उद्धव ठाकरेंच्या टिकेला आणि 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे तुफान भाषण; काँग्रेस व विरोधकांचा समाचार

Mumbai News :मुंबई :- विजयादशमीच्या निमित्ताने गोरेगाव येथील नेस्को सेंटरच्या मैदानावर पार पडलेल्या शिवसेनेच्या महामेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक आणि आंदोळनकारी फटकेबाजी केली. शिवाजी पार्कवर झालेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर, विशेषतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. तसेच राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'बाबत भाष्य करत विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली.https://maharashtramirror.com/ Mumbai news,

"आम्ही काम करणारी माणसं, आमची 'ऑपरेशन्स' विकासासाठी"; विरोधकांना टोला

मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांना फक्त टीका करण्याचे काम उरले आहे. विरोधकांकडून आमच्यावर सातत्याने 'ऑपरेशन'बाबत बोलले जाते, मात्र आमची ऑपरेशन्स ही महाराष्ट्र आणि जनतेच्या हितासाठी असतात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असताना सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद आणण्याचे काम आमचे सरकार करत आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी जनता विकासाच्या पाठीशी उभी आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेबांचा खरा विचार आणि जनाधाराचा मुद्दा ऐरणीवर

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना सोडण्यामागची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी आज आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असा घणाघात त्यांनी केला. अवघ्या अडीच तासांच्या या शिस्तबद्ध आणि थेट भाषणात उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या जनहिताच्या योजनांचा पाढा वाचत आगामी राजकीय वाटचालीचा निर्धार व्यक्त केला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો