મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Eknath Shinde : "अफवांवर विश्वास ठेवू नका, गॅस पुरवठा सुरळीत राहील"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना आवाहन; मुंबईत दाखल झाले 'कच्च्या तेलाचे' जहाज

Eknath Shinde On Gas Cylinder : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तहसीलदारांची विशेष पथके तैनात; 'शिलॉग' जहाजातून 1.35 लाख मेट्रिक टन तेल मुंबईत दाखल

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Eknath Shinde : "अफवांवर विश्वास ठेवू नका, गॅस पुरवठा सुरळीत राहील"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना आवाहन; मुंबईत दाखल झाले 'कच्च्या तेलाचे' जहाज

Eknath Shinde On Gas Cylinder : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तहसीलदारांची विशेष पथके तैनात; 'शिलॉग' जहाजातून 1.35 लाख मेट्रिक टन तेल मुंबईत दाखल

मुंबई‌ :- मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला धीर दिला आहे. "केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

"पंतप्रधान मोदींचे परिस्थितीवर बारीक लक्ष"

गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्र सरकार या संकटावर गांभीर्याने लक्ष देऊन आहे. गॅसचा तुटवडा भासणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, मात्र केंद्र आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही."

नवे वितरण नियम आणि पथकांद्वारे तपासणी

गॅस वितरण प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:

नियमित पुरवठा: शहरी भागातील ग्राहकांना 25 दिवसांनी, तर ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनी नियमित गॅस पुरवठा केला जाणार आहे.

तपासणी मोहीम: जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांनी विशेष पथके तैनात केली आहेत. ही पथके गॅस एजन्सी आणि गोदामांमध्ये जाऊन ग्राहकांची संख्या आणि उपलब्ध सिलेंडरचा साठा यांची कसून तपासणी करत आहेत.

व्यावसायिक सिलेंडर: सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून, घरगुती वापराच्या गॅसचा पुरवठा प्राधान्याने सुरू ठेवला आहे.

मुंबईसाठी दिलासा: 'शिलॉग' जहाज कच्च्या तेलासह दाखल
इंधन टंचाईच्या भीतीमध्येच मुंबईसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इराणची होर्मूज समुद्रधुनी पार करून 'शिलॉग' हे जहाज कच्च्या तेलाचा साठा घेऊन मुंबईच्या समुद्रात दाखल झाले आहे.

मोठा साठा: युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाचा साठा घेऊन मुंबईत येणारे हे पहिलेच जहाज असून, यात 1 लाख 35 हजार मेट्रिक टन तेल आहे.

શેર કરો