મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Nashik News : पावसाच्या शक्यतेमुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्यात बदलाची शक्यता; नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी रस्तेमार्गाचा पर्याय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची तयारी अंतिम टप्प्यात

Nashik News :नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पावसाच्या शक्यतेमुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्यात बदलाची शक्यता; नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी रस्तेमार्गाचा पर्याय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची तयारी अंतिम टप्प्यात
पावसाच्या शक्यतेमुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्यात बदलाची शक्यता; नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी रस्तेमार्गाचा पर्याय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची तयारी अंतिम टप्प्यात

Nashik News : सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रशासनाकडून आढावा

Nashik News :नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, ३१ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने दौऱ्याच्या नियोजनात बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींचा नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था तपासली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेला सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचा नव्याने आढावा घ्यावा लागण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Nashik News

ध्वजारोहण सोहळ्यासाठी जय्यत तयारी


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, राष्ट्रपतींचे विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रामकुंड येथे भेट देऊन हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला जाण्याचे नियोजन होते. यासाठी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली असून, पोलिसांनी प्रवासमार्गाची रंगीत तालीमही घेतली आहे.

हवामानाच्या अंदाजामुळे पर्यायी नियोजन


२९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नाशिकसह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता असल्याने हेलिकॉप्टरच्या उड्डाणातील संभाव्य अडथळे लक्षात घेऊन पर्यायी नियोजनाचा विचार सुरू आहे. रस्तेमार्गाचा पर्याय स्वीकारल्यास सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि प्रवासाच्या वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. अंतिम निर्णय हवामान आणि प्रशासनाच्या नियोजनानुसार घेतला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો