Dress-Code At Ekvira Devi Temple : आई एकविरा मंदिरात ‘ड्रेस कोड’ सक्तीचा; 7 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी
•महिला-पुरुष, भक्त-स्थानिक सर्वांनाच लागू असणार नवा आदेश
1 મિનિટ વાંચન

•महिला-पुरुष, भक्त-स्थानिक सर्वांनाच लागू असणार नवा आदेश
लोणावळा | ठाकरे कुटुंबाचे आराध्य दैवत आणि कोळी समाजाच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या आई एकविरा देवी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी आता ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. येत्या ७ जुलैपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार असून, अंगप्रदर्शन करणाऱ्या किंवा वेस्टर्न पोशाखातील भक्तांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
आई एकविरा देवी संस्थानने यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत स्पष्ट केलं की, “मंदिराच्या पावित्र्याचं रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, ड्रेस कोड पाळणे सर्वांसाठी अनिवार्य आहे.”
कोणते कपडे परवानगी योग्य?
महिलांसाठी: साडी, सलवार-कुर्ता, पारंपरिक पोशाख
पुरुषांसाठी: धोतर-कुर्ता, पायजमा-कुर्ता, पूर्ण अंग झाकणारे कपडे
मनाई असलेले कपडे: मिनी स्कर्ट, शॉर्ट्स, फाटकी जीन्स, हाफ पँट, वेस्टर्न आउटफिट्स, अंगप्रदर्शन करणारे कपडे
हा नियम फक्त पर्यटक किंवा भाविकांसाठी नव्हे, तर स्थानिक दुकानदारांनाही लागू होणार आहे. मंदिरात कोणताही भक्त अनुचित कपड्यांमध्ये आढळल्यास त्याला प्रवेश नाकारण्यात येईल, असा इशारा देखील संस्थानकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics : “हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भाजपचा राजीनामा!” – टी राजा सिंह यांचा निर्णय
