મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Phaltan News : वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित

Phaltan News : फलटण- उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरण
वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरण

Phaltan News : डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरण

Phaltan News : फलटण- उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी दोन दिवसांपूर्वी सायन येथील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉ. रुपनवर यांच्या मृत्युनंतर फलटणसह त्यांचे मूळ गाव असलेल्या माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Phaltan News
या घटनेची माहिती मिळताच माळशिरस तालुक्यातील डॉ. रूपनवर यांच्या गावातील नागरिकांनी फलटणकडे धाव घेतल्यामुळे फलटणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, नातेवाईक डॉ. रुपनवर यांचे पार्थिव घेवून मुंबईहून फलटणच्या दिशेने येत आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तत्काळ अटक न झाल्यास डॉ. रुपनवर यांच्या पार्थिवावर उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला असल्याचे समजते. https://maharashtramirror.com/ Phaltan News


वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित

डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती. डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीला डॉ. मदने या दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Phaltan News

डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी केले होते गंभीर आरोप
गेल्या महिन्यामध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधितांनी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव टाकून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र डॉ. रुपनवर यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. यानंतर चिडलेल्या संबंधितांनी डॉ. रुपनवर यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली होती.

શેર કરો