Mumbai News: डोंबिवलीत मनसेचा भाजपला धक्का; महिला पदाधिकाऱ्यांची घरवापसी
Mumbi News : मुंबई - डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपला राजकीय धक्का दिला आहे.
1 મિનિટ વાંચન

Mumbai News:भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा मनसेत प्रवेश
Mumbi News : मुंबई - डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपला राजकीय धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली. मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजू पाटील यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानावर गंभीर आरोप केला. “२०२४ मध्ये बोगस मतदान झालं, हे आम्हाला सर्व समजत होतं. मात्र, त्यावेळी काही करता आलं नाही,” असा दावा त्यांनी केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
आगामी काळात एसआयआरच्या (SIR) कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच, “अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार,” असा विश्वासही राजू पाटील यांनी व्यक्त केला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील विजयी झाले होते. ते मनसेचे एकमेव आमदार होते. मात्र, २०२४च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत ठाकरे गटाचे सुभाष भोईर, शिंदे गटाचे राजेश मोरे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यात राजेश मोरे विजयी झाले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत पुन्हा प्रवेश केल्याने डोंबिवलीच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. राजू पाटील यांच्या “अडीच वर्षांनंतर पुन्हा आमदार होणार” या दाव्यामुळे आगामी राजकीय समीकरणांकडेही लक्ष लागले आहे.
