Diwali Special 2024 : होपेसो फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी साजरी करताना प्राणी मित्रांना हानी होणार नाही याची दखल घेण्याचे केले आवाहन
पनवेल : सर्वत्र मोठ्या उत्साहात दिवाळी सण आबालवृद्ध साजरा करीत आहेत.
વ
વિવેક
1 મિનિટ વાંચન

पनवेल : सर्वत्र मोठ्या उत्साहात दिवाळी सण आबालवृद्ध साजरा करीत आहेत. हा सण साजरा करीत असताना मोठ्या प्रमाणात फटाके व आतषबाजी करण्यात येते. हे करताना मुक्या प्राणीमात्रांच्या जीवाला हानी होणार नाही याची दखल घ्यावी, असे आवाहन होपेसो फाऊंडेशनच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
होपेसो फाउंडेशनचे फाउंडर मोहनिष अनंत भोईर आणि कोमल मोहनिष भोईर यांनी आपल्या संस्थेकडून सर्वांना शुभेच्छा देताना आपला हिंदू सण उत्साहात आणि स्वतःची काळजी घेऊन पार पाडावा आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि प्राणीमात्रांना हानी होणार नाही याची दखल नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
