Pune Crime News : दिघीत दोन अल्पवयीन मुलांकडून १.१५ कोटीचे दागिने जप्त
Pune Crime News : पुणे /पिंपरी: दिघी येथे रेकी करून दोन अल्पवयीन मुलांनी घरफोडी केली.
1 મિનિટ વાંચન

Pune Crime News: रेकी करून केली घरफोडी; अवघ्या १२ तासांमध्ये पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
Pune Crime News : पुणे /पिंपरी: दिघी येथे रेकी करून दोन अल्पवयीन मुलांनी घरफोडी केली. घरातून सोने आणि चांदीचे एकूण एक कोटी १५ लाख रुपयांचे दागिने चोरी केले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये दिघी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून संपूर्ण दागिने जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी मधील संत गजानन महाराज नगर येथे पहाटेच्या वेळी घरफोडी झाली. घरफोडी मध्ये चोरट्यांनी घरातून ५१ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिघी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच सूत्रांच्या माहितीच्या आधारे घरफोडी करणाऱ्यांची ओळख पटवली.https://maharashtramirror.com/ Pune Crime News
घरफोडी करून दोघेजण बदलापूर, पूर्व ठाणे येथे गेले होते. पोलिसांनी बदलापूर येथून दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या १२ तासात ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी दोघांकडून ७५७ ग्रॅम सोन्याचे, ६४० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण बाजारभावाप्रमाणे एक कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही मुलांचे नातेवाईक दिघी येथे राहतात. ते मागील काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांकडे आले होते. इथे असताना त्यांनी संत गजानन महाराज नगर येथील एका घराची रेकी केली. घराला बाहेरून कुलूप असल्याने ते तोडणे सोपे होते. त्यामुळे त्यांनी घरात कोणी नसताना घरफोडी केली असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, पोलीस निरीक्षक विनायक पाटील, सहायक निरीक्षक श्रीनिवास कामूनी, उपनिरीक्षक आबा कटपाळे यांच्या पथकाने केली.
