Dharashiv ACB Trap : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; कनिष्ठ सहाय्यक आणि अंगणवाडी सेविका यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
Dharashiv ACB Trap News : अंगणवाडी मदतनीस पदावरून नियुक्ती करण्याकरिता मागितली 15 हजार रुपयांची लाच, एसीबीने लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना केले अटक
1 મિનિટ વાંચન

Dharashiv ACB Trap News : अंगणवाडी मदतनीस पदावरून नियुक्ती करण्याकरिता मागितली 15 हजार रुपयांची लाच, एसीबीने लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना केले अटक
धाराशिव :- लाचलुचपत प्रतिबंध विभाग, धाराशिव Anti-Corruption Department, Dharashiv यांनी कारवाई करत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यातील कनिष्ठ सहाय्यक आणि अंगणवाडी सेविका यांना पंधरा हजार रुपयांची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 15 Thousand Bribe मई बळीराम खांडेकर (34 वय) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यान्वित असून अंगणवाडी सेविका सोनाली संदीप कदम (28 वय) या दोघींना लाचप्रकरणी एसीबीने अटक केली आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. Anti-Corruption Bureau Latest News
एसीबीने दिलेला माहितीनुसार,यातील मई खांडेकर कनिष्ठ सहाय्यक आणि सोनाली कदम अंगणवाडी सेविका यांनी यातील तक्रारदार यांचे पत्नीचे (मौजे चिंचोली, तालुका-तुळजापुर) येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करुन यातील खांडेकर यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्वतः स्विकारली असता खांडेकर आणि कदम याना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे तुळजापूर , जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Anti-Corruption Bureau Latest News

एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विकास राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.सापळा पथक पोलीस- अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी दत्तात्रय करडे यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. Anti-Corruption Bureau Latest News
हेही वाचा: Thane Mobile Robbery News : गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत; कळवा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
- #ACB Trap News
- #ला.प्र.वि. धाराशिव युनिट.सापळा पथक पोलीस- अंमलदार मधुकर जाधव
- #acb News
- #Anti-Corruption Bureau Latest News
- #ला.प्र. वि
- #Dharashiv ACB Trap
- #Dharashiv Breaking News
- #संदीप आटोळे पोलीस अधीक्षक
- #पोलीस उपअधीक्षक
- #पोलीस ठाणे तुळजापूर
- #मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक
- #ला.प्र.वि
- #Dharashiv News
- #ला.प्र.वि. धाराशिव युनिट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विकास राठोड
- #छत्रपती संभाजीनगर सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे
- #लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
- #कनिष्ठ सहाय्यक अंगणवाडी सेविका यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
- #Dharashiv ACB Trap News
- #छत्रपती संभाजीनगर
- #पोलीस निरीक्षक
- #લાંચ રુશ્વત વિરોધી બ્યુરો
