મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai news : मुंबईतील आंदोलनाचा जरांगेंनी पुनर्विचार करावा : फडणवीस

Mumbai news मुंबई, महाराष्ट्र मिरर : मराठा आरक्षणासंदर्भातील बहुतांश मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

मुंबईतील आंदोलनाचा जरांगेंनी पुनर्विचार करावा : फडणवीस
मुंबईतील आंदोलनाचा जरांगेंनी पुनर्विचार करावा : फडणवीस

Mumbai news : मराठा आरक्षणाच्या बहुतांश मागण्या पूर्ण

Mumbai news मुंबई, महाराष्ट्र मिरर : मराठा आरक्षणासंदर्भातील बहुतांश मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. उर्वरित मागण्या न्यायालयीन प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असून, त्याबाबत संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच निर्णय घेता येईल. गणेशोत्सव सुरू असताना मुंबईत आंदोलन करून गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय करणे योग्य नाही. त्यामुळे प्रस्तावित आंदोलनाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना आणि आरती केल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांच्या ‘चलो मुंबई’ आंदोलनाबाबत ते म्हणाले की, सरकारने सातत्याने प्रयत्न करून जवळपास सर्व मागण्यांवर निर्णय घेतला आहे. मात्र, उर्वरित बाबींमध्ये न्यायालयीन आणि संवैधानिक प्रक्रिया पाळावीच लागणार आहे. कायद्याच्या चौकटीत शक्य असलेले निर्णय घेण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
सरकारने चर्चेचे दरवाजे कधीही बंद केलेले नाहीत आणि सर्व मागण्यांचा खुल्या मनाने विचार केला आहे, असेही फडणवीस म्हणाले. सध्या राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह असल्याने मुंबईतील आंदोलनामुळे भाविक आणि नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आंदोलनाचा पुन्हा विचार करण्याची विनंती त्यांनी केली.
राज्यात समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून, तिचे काम सुरू आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार पुढील कार्यवाही करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे तसेच प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले.

શેર કરો