Pune News : मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर
Pune News :पुणे: आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या प्रचाराला जोरदार वेग देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येत आहेत.
1 મિનિટ વાંચન

Pune News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराला मिळणार वेग
Pune News :पुणे: आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या प्रचाराला जोरदार वेग देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेणार असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती निश्चित करणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
भाजप-महायुतीकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पक्षाचा प्रचार अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.
या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि सरचिटणीस राजेश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यापूर्वीच विविध कोअर समित्यांच्या आढावा बैठका संपन्न झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांत विशेष प्रभारींची नियुक्ती करून बूथनिहाय नियोजन, स्थानिक प्रश्नांची मांडणी आणि पदवीधर-शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधण्यावर विशेष भर दिला जात आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत सुमारे साडेचार लाखांहून अधिक पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे महायुतीच्या प्रचाराला आणखी धार मिळणार असून विरोधकांविरुद्ध लढण्यासाठी तगडी यंत्रणा उभी राहण्यास मदत होणार आहे.
