મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Devendra Fadnavis यांच्या दिल्ली वारीच्या चर्चांना पूर्णविराम

पंढरपूर, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

2 મિનિટ વાંચન

devendra fadnavis

Devendra Fadnavis : "मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, दिल्लीचा विषयच नाही

पंढरपूर, महाराष्ट्र मिरर

Devendra Fadnavis : राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी एकाच वाक्यात सर्व चर्चा फेटाळून लावले आहेत.

"मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, त्यामुळे मी त्यांनाही महाराष्ट्रातच ठेवणार," असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीच्या सर्व शक्यतांवर पडदा टाकला आहे. प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी हे सूचक आणि मिश्कील भाष्य केले. Devendra Fadnavis delhi politics wife amruta

गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व दिल्लीत बोलावून घेणार असून ते केंद्रीय मंत्री होणार, अशा जोरदार चर्चांना उधाण आले होते. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात आधी फडणवीस यांच्या केंद्रातील जाण्याबाबतचा दावा केला होता.

एवढेच नव्हे तर, फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जावी, अशी अपेक्षाही शिवसेनेच्या गोटातून व्यक्त केली जात होती. या सर्व राजकीय वावटळीवर अमृता फडणवीस यांनी दिलेल्या या उत्तरामुळे आता विरोधकांच्या मनसुब्यांना मोठा सुरुंग लागल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. Devendra Fadnavis

या मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरही आपली रोखठोक भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "जोपर्यंत हे आंदोलन नीट पेपरफुटीच्या मुद्द्यापुर्ती मर्यादित आहे, तोपर्यंत ते पूर्णपणे योग्य आहे."

PMPML: खर्चाचा डोंगर आणि थकबाकीमुळे पुणेकरांची ‘जीवनवाहिनी’ व्हेंटिलेटरवर

पुढे बोलताना त्यांनी सरकारची बाजू मांडली. "नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सरकार पडद्यामागे अत्यंत गांभीर्याने काम करत होते, ज्याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाऊ नये आणि त्यांना अपेक्षित असलेली पारदर्शकता राहावी, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, शिक्षेत वाढ आणि कठोर नियमांची नवी दिशा सरकारकडून आखली जात आहे," असे त्या म्हणाल्या. Devendra Fadnavis

जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया देताना त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "आंदोलनात काही समाजकंटकांनी पोलिसांवर वार केले, तर काही विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज झाला, हे अत्यंत निंदनीय आहे. तो एक अत्यंत काळा क्षण होता. अशा प्रकारच्या घटना भविष्यात कुठेही घडायला नकोत. आंदोलनातील मुलींशी जर कुठेही गैरवर्तन झाले असेल, तर संबंधित दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे," अशी ठाम मागणी त्यांनी केली. Devendra Fadnavis

रविवार, दि. २६ रोजी मुंबईत होत असलेल्या ठाकरे बंधूंच्या (मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) नियोजित मोर्चाबाबत विचारले असता, अमृता फडणवीस यांनी अत्यंत दिलखुलास प्रतिक्रिया दिली. "ते दोघे भाऊ एकत्र येऊन जर काही करत असतील, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. इतके वर्ष ते एकमेकांपासून वेगळे होते, त्यामुळे त्यांच्या या एकत्र येण्याकडे आपण सर्वांनी अत्यंत सकारात्मक दृष्टीनेच पाहिले पाहिजे," असे त्या म्हणाल्या.

TET : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंडला बिहारमधून जेरबंद

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો